प्रगती फाऊंडेशन तर्फे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वेबिनार

प्रगती फाऊंडेशन, मुंबई यांनी “शालेय शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा” याबाबत मोफत युट्यूब मार्गदर्शन वेबिनार, शनिवार, दिनांक ४ जुलै २०२० रोजी ठीक दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले आहे.


कोरोना महामारीकाळात सरकारी सूचनप्रमाणे ऑनलाईन शिक्षण प्रणालीस प्राधान्य देण्यात आले आहे. तरी शहरी असो किंवा ग्रामीण सगळ्याच भागात याबाबत तंत्रज्ञान वापराविषयी साक्षरता अजूनही झाली नाही आणि म्हणूनच प्रगती फाऊंडेशन मार्फत डिजिटल तंत्रज्ञान साक्षरता अभियान कार्यक्रम अंतर्गत शिक्षक व विद्यार्थी यांना डिजिटल तंत्रज्ञान योग्य रीतीने हाताळता यावे या उद्देशाने मार्गदर्शनपर मोफत वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.


यात ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे, मोबाईलचा वापर शिक्षणासाठी कसा करावा  गूगल क्लासेस कसे वापरावे, डिजिटल तंत्रज्ञान वापर करताना कोणते शैक्षणिक टूल्स वापरावे आदी विविध विषयांवर, ज्येष्ठ तज्ञ शिक्षक आणि गुगल व मायक्रोसॉफ्ट पुरस्कार विजेते शिक्षक श्री बालाजी जाधव यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी यात सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी आवश्यक आहे आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरा.


तसेच या वेबिनार विषयी अपडेट्स जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप ग्रुपमध्ये सामील व्हा.
https://chat.whatsapp.com/IfusW4RxR5Q6GzEu6yzRPK


सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनी हा ऑनलाईन वेबिनारचा जरूर लाभ घ्यावा असे फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे.