

कोरोनाच्यात महामारित सर्व व्यवहार पूर्ण ठप्प झाले आहेत. अशावेळी आता श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यात सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. लालाबाचा राजा हा मुंबईतील सर्वात मोठा सार्वजनिक गणपती. यंदा लालबागच्या राजाने मूर्ती न बसविता अरोग्योत्सव साजरा करण्याच ठरवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना आवाहन केले होते की, सण सध्यापणाने साजरा करा आणि अधिकाधिक समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत. याला लालबागच्या राजाने सकारात्मक प्रतिसाद दिला. याचेच अनुकरण करीत आता मुंबईतील प्रसिद्ध चिंतामणी गणेश उत्सव मंडळाने सुद्धा मूर्ती न घडविता आरोग्य विषयक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.











