कोरोनाची दुसरी लाट सुरू?

मुंबई (अतुल माने)

ऑक्टोबर मध्ये नियंत्रित आलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून ही दुसरी लाट असल्याचे वैद्यक तज्ञांचे म्हणणे आहे. शिथिलता दिल्यानंतर दीपावली काळात उमादी उत्साह आणि खरेदीसाठी केलेली तोबा गर्दी , पर्यटन तसेच मास्क न वापरायचा केलेला अतिआत्मविश्वास व भेटीगाठी याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले.

अगदी आकडेवारी द्यायची म्हटली तर महानगरी मुंबई मध्ये गेल्या काही दिवसात रुग्णाचा आकडा 400 ते 500 एवढा खाली येत असताना गेल्या 2 दिवसात तो पुन्हा 900 ते 1000 पर्यन्त गेला आहे. तीच गत ठाणे नवी मुंबई या शहरांची. ठाणे मधून आता 200 रुग्ण फक्त शहरातून मिळत आहेत तर नवी मुंबई चो आकडेवारी बोलकी आहे. 16 तारखेला 61 , 17 रोजी 91, 18 तारखेला 131 तर 19 रोजी 191 रुग्ण मिळाले आहेत. पुणे येथेही हा आकडा पुन्हा वाढत आहे. हीच अवस्था नागपूर , सातारा, कोल्हापूर, सांगली आदी शहरांचो आहे. येथे गेल्या काहो दिवसात घटलेली रुग्ण संख्या पुन्हा वाढीकडे सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाची दुसरी लाट जगभरात हाहाकार माजवीत असताना भारतात नवी दिल्ली, पंजाब हरयाणा तसेच केरळ मध्ये ही लाट पुन्हा सुरू झाली. नवी दिल्ली मध्ये पुन्हा लॉक डॉउन करण्याचा प्रशासन विचार करत आहे. पण महाराष्ट्र मध्येही ही सुरुवात झाल्याने पुन्हा प्रशासनापुढील आव्हाने वाढली आहेत।