WHO निर्णय: फायजर-बायोटेक लस आपातकालीन वापरास मंजूरी

फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपातकालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांसमोर असलेला कोरोना व्हायरस लस (Coronavirus Vaccine) आयात, वितरणाचा प्रश्न सुटला आहे.

फायजर-बायोटेक लस (Pfizer-BioNTech Vaccine ) वापरासाठी मान्यता देणारा इंग्लंड हा पहिला देश होता. या देशाने 8 डिसेंबर 2020 या दिवशीच ही मान्यता दिली होती. इंग्लंडपाठोपाठ अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही या कोरोना लसीच्या (COVID 19 Vaccine) आपातकालीन वापरास परवानगी दिली आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरातील नागरिकांना जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने खुशखबर दिली आहे.