
अनेक कंपन्यांच्या लसी बाजारात आल्या असून भारत सरकारने नुकतेच सीरम कंपनीच्या ‘कोविशिल्ड’ लसीला परवानगी दिली आहे. कोणती लस किती प्रभावशाली किंवा कार्यक्षम आहे, याबाबत कंपन्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. त्यामुळे लस घेण्याबाबत नागरिकांत संकोच असू शकतो. दरम्यान, कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी देशातील जनतेला आश्वस्त केले आहे.
प्रत्येकाला विश्वास देतो की, कोरोना लस सुरक्षितच आहे. लसीने सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पार केल्या असून तिचे कोणतेही गंभीर परिणाम नाहीत. लोकांनी लस घेण्यात कोणताही संकोच बागळू नये, असे डॉ. मांडे यांनी म्हटले आहे.
देशातील चार राज्यात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात येत आहे. लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी झाला, असे जर देशाचे आरोग्य मंत्री म्हणत असतील तर नक्कीच ड्राय रन यशस्वी झाले. लसीकरणासाठी भारत प्रगतीपथावर आहे. भारतातील कोरोना लसीकरण सार्वत्रिक निवडणुकीसारखे असल्याचे डॉ. मांडे म्हणाले. नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी तयारी अती महत्त्वाची आहे. लस दिल्यानंतर नागरिकांवर निगराणी ठेवाली लागेल, असे मांडे म्हणाले.











