ग्रेट ब्रिटन (इंग्लंड) मध्ये परिस्थिती गंभीर, संपूर्ण ब्रिटन फेब्रुवारी पर्यंत लॉक डाऊन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना संक्रमणच्या नव्या स्ट्रेनचा वाढता धोका लक्षात घेत पुन्हा देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. बोरिस जॉनसन म्हणाले की, कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कमीत कमी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नवा नॅशनल लॉकडाउन लावण्यात येत आहे, जेणेकरून नवा स्ट्रेन नियंत्रणात आणता येईल. एका बाजूला ब्रिटनमध्ये कोरोना वॅक्सीन लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नव्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.

बोरिस जॉनसन यांनी सोमवारी रात्री देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, देशासाठी हा अत्यंत कठिण काळ आहे. देशाच्या सर्वच भागात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. सध्या, ब्रिटनमध्ये शाळा, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शिक्षणसाठी ऑनलाइन मार्ग स्वीकारण्यात आला आहे. युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी फेब्रुवारच्यापर्यंत मध्या पर्यंत कॅम्पसमध्ये परतणार नाहीत. लॉकडाउनच्या दरम्यान लोकांना घरातच रहावे लागेल आणि फक्त अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी असणार आहे.