
मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) किशोर पेडणेकर (Kishori Pednekar) यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आजाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan police station) अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोरी पेडणेकर या 22 डिसेंबर रोजी मुंबई महापालिका कार्यालयात असताना त्यांना हा फोन आला होता. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी आजाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले. परंतु, त्यांना 22 डिसेंबर रोजी हा फोन आला. मात्र, त्यांनी 31 डिसेंबरला इतक्या उशिरा का पोलिसांत तक्रार दाखल केली? यासह अनेक चर्चांना उधाण आले आहेत.
सध्या किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्याऱ्या व्यक्तिचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांना धमकी देण्यामागे संबंधित व्यक्तिचा काय हेतू होता? याबाबतही चौकशी केली जात आहे.
परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या किशोरी यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे.










