धक्कादायक ! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिक – नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात संशयित आरोपींना अटक केली आहे.

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हंटल आहे.

सात आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका मुलीचाही समावेश आहे.