आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हा – अजित पवार

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021) आता लवकरच पूर्णपणे हाती लागेल.

विजयी झालेल्या उमेदवारांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे’ असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.