
पश्चिम बंगालच्या निमित्तानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (Pradhan mantri kisan samman Nidhi scheme) सर्वात मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. असे झाल्यास नव्याने नोंदणी झालेल्या शेतकर्यांच्या हाती अधिक पैसे येणार आहेत.
जेव्हा एखादा शेतकरी अर्ज करेल, तेव्हा त्याला आधीच्या हप्त्यांचे पैसे मिळतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या प्रकरणात असेच विधान केले आहे.
शहा यांनी तेथील शेतकऱ्यांना सांगितले आहे की, “ पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळात आम्ही मागच्या 12,000 रुपयांसह 6000 रुपये देऊ. म्हणजेच आपल्या खात्यात 18,000 रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. ”










