
पुणे -सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील बीसीजी प्लान्ट मधील आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांना पाच मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह ससून सर्वोपचार रुग्णालयात रवाना झाले आहेत.
दरम्यान सीरमचे सर्वेसर्वा आदर पुनावाला यांनी दुपारी आगीमध्ये कोणतिही जिवीतहानी झाली नसल्याचे ट्विट केले होते. परंतु आग आटोक्यात आल्यानंतर कुलिंग कामाच्या दरम्यान बचावकार्य सुरु होते. त्यावेळी आर-बीसीजी प्लान्ट इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पाच मृतदेह आढळले.
त्यांची ओळख अद्याप पटली नसून सर्व मृतदेह ससून सर्वोपचार रुग्णालयाकडे रवाना झाले असल्याची माहिती अग्निशमन विभागासह सीरमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.











