प्रगती फाऊंडेशन आणि विमल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत भव्य आरोग्य शिबीर

आमदार गणेश नाईक व महापौर जयवंत सुतार यांची प्रमुख उपस्थिती


आज 26 जानेवारी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे , प्रगती फाउंडेशन मुंबई (रजिस्टर) आणि विमल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आजचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन तसेच प्रकाश ढसाळ आणि आकाश ढसाळ या नवी मुंबईतील समाजसेवक यांचा वाढदिवस.

वाढदिवस साजरा करीत असताना समाजाचे पांग फेडावे हे मानून आपण राहत असलेल्या समाजात आपल्याला काहीतरी द्यावे लागेल या भावनेने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

प्रगती फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्राच्या विविध भागात शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. सहयोगी संस्था विमल फाऊंडेशन ही त्यांच्या स्थापनेपासून नवी मुंबईत विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते. प्रगती फाऊंडेशन व विमल फाऊंडेशन दरवर्षी संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत महा आरोग्य शिबीर राबवीत असतात.

शिबिराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. शिबिरामध्ये संपूर्ण शरीर तपासणी, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, हृदय तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर चाचणी, रक्तगट चाचणी, ईसीजी सेवा मोफत देण्यात आल्या. त्यासह विनामूल्य चष्मा वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.


सुमारे 250 हून अधिक लोकांनी शिबिराला भेट दिली व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. डि. वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल, मिलेनियम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्वराशी नेत्रालय, श्री साई ब्लड बँक, डॉ विश्वास यांचे दंत चिकित्सालय, श्री हरिहर पुत्र भजन समाज मंडळ, आणि आय. टी. एम. आरोग्य विज्ञान संस्था ( आयटीएम संस्था.) यांच शिबिराला विशेष सहकार्य लाभले.


या शिबिराचे उद्घाटन नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते झाले.


या शिबिरास स्थानिक कार्यकर्ते, समाजसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पदाधिकारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


रक्तदान शिबिरात जमा झालेले रक्त कॅन्सर वर उपचार कराणाऱ्या व्यक्तीना देण्यात येणार आहे.


परिसरातील सर्व रहिवाशांना खालील प्रमाणे मोफत आरोग्यविषयक उपचार सुध्दा उपलब्ध करून देण्यात आल्या.तसेच अवयव दानाविषयी जनजागृती करून याविषयीची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई चे शिल्पकार, लोकनेते, आमदार आद. गणेशजी नाईक साहेब व महापौर आद.जयवंतजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते लालफीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

आमदार गणेश नाईक व महापौर जयवंत सुतार यांनी आरोग्यशिबिराची संपूर्ण माहिती घेतली, व जनतेशी सुसंवाद साधला आणि कार्यकरत्याना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ.माधुरी सुतार , माजी नगरसेविका वैशाली भगत व समाजसेवक निशांत भगत, युवा नेते वैभव नाईक, ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे, ड प्रभाग समिती सदस्य मा.सुनील कुरकुटे, युवा नेते संतोष पाटील,समाजसेविका शैलेजा पाटील , समाजसेवक अण्णा पाटील, अर्जुन पाटील,बबन पाटील, हनुमंत नाना रोडे ,सुरेश पाटील,सारिका भोईर व आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जयेश मढवी, रुपेश गायकवाड,बाळू जरे, बापू शिंदे आणि त्यांचे सहकारी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला बौध्दजन पंचायत समीतीचे सदस्य सिध्दार्थ साळवी व त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते. जुईनगर मधील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील अध्यक्ष अंकुश नलावडे, कवडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते व त्यांनी सुद्धा या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. समाजसेवक श्री.शैलेश भोईर व हनुमान पाटील यानी सुद्धा उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

प्रगती फॉउंडेशन व विमल फॉउंडेशन च्या वतीने सर्वच आयोजक संस्थांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .

या कार्यक्रमाचे आयोजक विमल फौंडेशन चे अध्यक्ष मा.प्रकाश ( भाऊ ) ढसाळ व प्रगती फौंडेशन चे अध्यक्ष मा.किरण राणे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले.