नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक सुरक्षा अभियान 2021

वाहतूक सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत इन्फिनिटी फाउंडेशन व युथ डेव्हलपमेंट चेंबर ऑफ रायगड च्या सदस्यांनी २९ जानेवारी २०२१ रोजी कलंबोली वाहतूक शाखा येथे सहभाग घेतला व रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती केली .

या कार्यक्रमांमध्ये निशिकांत विश्वकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत म. साळुंखे पोलीस उपनिरीक्षक, मोहन मुळीक पोलीस उपनिरीक्षक यांनी उपस्थित सर्व सदस्यांना व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले व वाहतुकीचे नियम अवगत करून दिले त्यानंतर सर्व सदस्यांनी वाहतूक नियमांविषयी वाहन चालकांमध्ये जनजागृती केली या कार्यक्रमांमुळे सर्व स्वयंसेवकांना पोलिसांसोबत वेळ घालवण्याचे व वाहतुक नियमांचे विषयी अधिक माहिती घेण्याची संधी प्राप्त झाली.