नेरूळ एल आय जी कॉलोनी मलनिःसारण कामांचे महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी दौरा

नेरूळ सेक्टर २ एल आय जी कॉलोनी मधील आम्रपाली असोसिएशन मधील पावसाळी पाण्याचा नाला यातील गाळ व माथी काडून साफ करण्यात आला होता. सदरच्या पावसाळी नाल्यातून मलवाहीनी(सेवेज लाईन) टाकण्याचे काम सुरू होते पण याने पावसाळी नाल्याची रुंदी कमी होऊन पुन्हा पावसाळयात पाणी भरण्याचा धोका लक्षात येताच समाजसेवक श्री विकास पालकर यांनी महापालिका मलनिःसारण वरिष्ठ अधिकारी श्री.बिराजदार साहेब व श्री.बावीसकर साहेब यांच्याशी संपर्क साधून सदरच्या ठिकाणी बोलावले तसेच सोसायटिचे अध्यक्ष श्री नरेश भोईर साहेब,श्री नारायण शिंदे साहेब,श्री तानाजी शेलार साहेब,श्री अण्णा रामापुरे साहेब,सौ पाटील ताई,श्री भारत उजगरे साहेब यांना सोबत घेऊन, संपूर्ण गोष्टीची पार्शवभूमी अधिकाऱ्यांना समजून सांगून योग्य तो मार्ग काडण्यात आला..


तसेच एल आय जी कॉलोनी मधील सुरू असलेल्या मलवाहिनी कामांची अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा करण्यात आला त्याकरिता महापालिका वरिष्ठ अधिकारी श्री बिराजदार व श्री.बावीसकर उपस्थित होते.