आज देशभर तीन तास ‘चक्का जाम’ची हाक

नवी दिल्ली – आज शनिवारी आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे. कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे.

दिल्ली वगळून देशभर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर आज, शनिवारी दुपारी १२ ते ३ दरम्यान चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असे कृषी संयुक्त किसान मोर्चातर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. दिल्ली सोडून देशात अन्यत्र तीन तास चक्का जाम करण्यात येईल, परंतु त्यातून शाळा बस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांना वगळण्यात येईल, असे किसान मोर्चाने स्पष्ट केले.