
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आपल्या आगामी अनेक चित्रपटांसाठी चर्चेत आहे. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘राधे श्याम’. प्रभासचा हा चित्रपट बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे.
व्हॅलेंटाईन डे च्या खास प्रसंगी प्रभास आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना ‘राधे श्याम’ चित्रपटाच्या टीझरची खास भेट दिली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रभास एका प्रियकराच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचवेळी या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री पूजा हेगडेसुद्धा टीझरमध्ये दिसली आहे.
टीझरमध्ये दोघेही डायलॉग बोलताना दिसत आहेत. टीझरमध्ये पूजा हेगडे प्रभासला म्हणते की, ‘तू स्वत: ला रोमियो समजतोस का?’, यावर प्रभास म्हणतो, ‘नाही, त्याने प्रेमापोटीच आपला जीव दिला होता, मी त्या प्रकारातील नाही’.











