
सातारा जिल्हयात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. जिल्ह्यात कोरोनाची नवी प्रजाती आढळलेली आहे असून प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील शहरी भागचं नव्हे तर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे खटाव, कोरेगाव, माण, तालुक्यात अनेक ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एका कोरोना रुग्णामध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील अनेक नेत्यांनी लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात येतील, असं म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी 6,281 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच 40 रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 93 हजार 913 इतकी झाली आहे. याशिवाय मृतांचा आकडा 51,753 वर पोहोचला आहे.










