
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोरोना लस घेणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. यानंतर त्यांना लस देण्यात आली. ही लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोवँक्सिन या लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही. लस घेताना कळत नाहीत. कोरोनाचा धोका परत वाढतो. त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.
कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लसीकरण करुन घ्या. बाहेरचं अनावश्यक जाणं टाळा. आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. नाईलाजाने परत कडक लॉकडाऊन करावा लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.











