सावधान: महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 15,817 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 56 जणांचा बळी

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 15,817 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 56 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 22,82,191 वर पोहचला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिव जिल्हानिहाय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधुन आढावा घेत आहेत.