अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग सुकर, गणित आणि भौतिकशास्त्र बंधनकारक नाही.

अभियांत्रिकीसाठी पदवी घेऊ इच्छिणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिलासा दिला आहे. यापुढे बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय घेतले नसतील तरीही त्याला अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेता येणार आहे. “एआयसीटीई’ या निर्णयावरून शिक्षण क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. “एआयसीटीई’ने दोन दिवसांपूर्वी 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीची हस्तपुस्तिका प्रसिद्ध केली.