नवी मुंबई वेडिंगअसोसिएशन ची बैठक: कोरोनामुळे कॅटरिंग व्यवसाय संकटात; आयुक्तांचा शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद

मागील वर्ष भरापासून कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नियमावली यामुळे लग्नसराई तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध आले आहेत. अनलॉक करून दैनंदिन व्यवहार सुरु होतआहेत असे वाटत असताना कोरोणाची दुसरी लाट आली आहे.

नव्याने जारी करण्यात आलेल्या कोरोना नियमावली मुळे लग्न समारंभ आयोजित करण्यावर अटी आणि शर्ती लादण्यात आले आहेत. यामुळे हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे.

आज नेरुळ आश्रय हॉल येथे नवी मुंबई वेडिंग असोसिएशन ची याबाबात समस्या मांडण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला संबोधित करण्यासाठीं बॉंबे कॅटरिंग असोसिएशनचे श्री कामत, श्री सुनील वेंगुर्लेकर, श्री ललित जैन, तसेच श्री पारेख आदी सभासद तथा पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व सभासदांना मिटिंग साठी श्रीयुत नटे यांनी आश्रय हॉल, नेरुळ उपलब्ध करून दिला आणि सोबतच शेखर अण्णा यांनी उत्कृष्ट जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती.

कार्यक्रमाचे मीडिया कव्हरेज नवी मुंबई आवाज चॅनेल च्या माध्यमातून करण्यात आले त्याची जबाबदारी प्रकाश ढसाळ यांनी उचलली होती .

बैठकीनंतर नवी मुंबई आयुक्त मा. अभिजित बांगर यांना कोरोना काळात कॅटरिंग व्यवसाय यावर आलेली गदा कशी कमी करता येईल याविषयी नियमावली तयार करण्यात यावी अशा आशयाचा विनंती अर्ज देण्यात आला. सदर अर्जात सर्वच नवी मुंबई मधील कॅटरिंग आणि डेकोरेटर व या व्यवसायाशी निगडित असणाऱ्या सर्वांच्या समस्या मांडण्यात आल्या.

यावर न. मु आयुक्त अभिजित बंगार यांनी लवकरच योग्य तो निर्णय घेऊन तुम्हाला न्याय दिला जाईल असं सकारात्मक आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिल.