पुणे Covid 19 नवीन कडक निर्बंध जाहीर: 3 एप्रिल पासून हॉटेल, सिनेमागृह, बार, PMPML बस सेवा 7 दिवस पूर्णपणे बंद; संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी

पुणे जिल्ह्यांमध्ये वाढता कोरोना पाहता आता नियम अजून कडक करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण आणि शहर भागांत वाढता प्रादुर्भाव पाहता संध्याकाळी 6 ते दिवसा 6 या 12 तासांसाठी संचारबंदी (Night Curfew) असेल तर दिवसा जमावबंदी लागू राहणार आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

दरम्यान उद्या (3 एप्रिल) पासून हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे डाईन इन साठी पुढील 7 दिवसांसाठी पूर्ण बंद केली आहे. पण होम डिलेव्हरी सुरू राहणार आहे.

यासोबतच पुणे शहरामध्ये पीएमपीएमएल बस (PMPML Bus Service) सेवा बंद राहणार आहे. पण एसटी सेवा (ST Bus Service) ही सुरू राहणार आहे. सोबतच सारी प्रार्थनास्थळं देखील 7 दिवस पूर्णपणे सुरू राहणार आहे. 

 शहरांत लग्न आणि अंत्यविधी वगळता सारे धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. पुण्यात 30 एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. पण 10 वी 12वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (Pune Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी दिली आहे.