IPL 2021: RCB बंगळारू संघाचा Mumbai Indians वर रोमांचक विजय

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या सत्राची दणक्यात सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या (IPL0 2021 मोसमातील पहिला सामना गेतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला गेला. 

या रोमांचक सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्सने दिलेले 160 धावांचे लक्ष्य आठ विकेट गमावून गाठले. 

संघासाठी मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने शानदार फलंदाजी केली आणि 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आयपीएलच्या (IPL) सलामीच्या सामन्यात विजयासह आरसीबीने गुणतालिकेत शीर्षस्थानी गाठले आहे.

आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते जे बेंगलोर संघाने 8 विकेट्स गमावून अखेरच्या चेंडूमध्ये गाठले.

आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) सर्वाधिक 48 धावांची शानदार खेळी केली तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

आरसीबीने (RCB) मुंबईवर निसटता विजय मिळवला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही करत सामन्याच्या अखेरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर डिव्हिलियर्स धावबाद झाल्याने सामना आरसीबीच्या हातून निसटेल असं वाटत होतं. हर्षल पटेलने (Harshal Patel) शेवटची धाव घेत संघाला विजयीरेष ओलांडून दिली.