नवीन विचारांच्या निर्मात्यांची संवाद साधण्यासाठी खास युवकांसाठी श्री.धनराज विसपुते फाउंडेशनच्या वतीने “आदर्श युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन

राज्याचे युवा नेतृत् बदल घडविणारे आणि नवीन विचारांच्या निर्मात्यांची संवाद साधण्यासाठी खास युवकांसाठी श्री.धनराज विसपुते फाउंडेशनच्या वतीने 23 एप्रिल 2019 रोजी “आदर्श युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

सदर मार्गदर्शनपर कार्यक्रम फेसबुक लाईव्ह माध्यमातुन आयोजित करण्यात आला होता. समाजातील तरुण वर्ग आपल्या समाजासाठी काय विचार करत आहे आणि त्याने त्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांनी समाजात कशा प्रकारे सकारात्मक बदल घडवून आणायला हवे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या अनोख्या ऑनलाइन आदर्श युवा संवाद कार्यक्रमाला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री .धनराजजी विसपुते , भारतीय जनता पार्टी , युवा मोर्चा , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. विक्रांतजी पाटील , भारतीय जनता पार्टी , युवा मोर्चा , महाराष्ट्र प्रदेश सचिव मा .श्री. हर्षलजी विभांडक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री. धनराज विसपुते फाउंडेशन च्या वतीने युवकांना मिळणाऱ्या संधीविषयी व येणाऱ्या अडचणीं विषयी प्रमुख वक्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व कोरोना महामारी मध्ये आपण स्वतःला व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवून येणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जायचे? या संधीतून नवीन प्रयोग किंवा नवीन संकल्पनेतून आपला विकास कसा करता येईल यावरसुद्धा चर्चा करण्यात आली .