
रक्तदान हे जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचे प्राण – ॲड.सुनिल हासनराव देशमुख
आ.श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात कोरोना च्या पार्श्वभूमीवर बुलडाणा तालुका भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण देशात कोरोनाव्हायरस covid-19 या आजाराने थैमान घातले आहे. या परिस्थितीत रक्ताचा भासवणारा तुटवडा लक्षात घेता दिनांक २ मे रोजी भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल हासनराव देशमुख यांच्या सेवा संपर्क कार्यालय, देशमुख टावर,धाड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.देविदास पाटील जाधव, भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा पंचायत समिती सदस्य श्री.संदीप पाटील उगले आदी होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री.ॲड.सुनिल देशमुख यांनी रक्तदान का करावे व त्याचे फायदे काय ही अगदी विस्तृत माहिती उपस्थित रक्तदात्याना उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.

रक्तदानाचे फायदे – १) आपल्या पवित्र व अनमोल रक्तदानामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णास जीवनदान मिळते. २) रक्तदानामुळे आपल्या शरीरात नवीन रक्तपेशी तयार होण्यास चालना मिळते. ३) रक्तदानामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. ४) आपला रक्तगट माहीत होतो. ५) भविष्यासाठी आपले रक्त रक्तपेढीमध्ये साठवता येते. ६) आपण रक्तदानाच्या स्वरूपात केलेले ३५० मि. ली रक्त हे आपल्या शरीरात अवघ्या ४८ तासात भरून निघते. यासाठी १८ ते ५५ वर्षाच्या आतील सर्वांनी वर्षातून किमान दोनदा तरी रक्तदान केले पाहिजे. विशेषतः तरुण-तरुणींनी सामाजिक दायित्व समजून व सध्या परिस्थितीत महाराष्ट्रात व जिल्ह्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता व्हाक्सीन घेण्याच्या अगोदर किव्हा व्हाक्सीन घेतल्या नंतर ६० दिवसाने आरोग्य प्रशासनास एक हात मदतीचा ही भावना ठेवत मोठ्या संख्येने रक्तदान हे केले पाहिजे. रक्तदान ही जन सामान्यांची सेवा आहे यालाच ईश्वरसेवा आपण म्हणू शकतो.

नुकतेच महाराष्ट्र राज्याचे सक्षम विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रकांतजी पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मा.मंत्री आ.श्री.डॉ.संजयजी कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.श्री.आकाशजी फुंडकर यांच्या निर्देशानुसार, बुलडाणा विधानसभेचे मा.आ.ध्रुपदरावजी सावळे, मा.आ.श्री.विजयराजजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस श्री.योगेंद्रजी गोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील रक्तदान शिबीर हे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

प्रसंगी आ.श्वेताताई महाले पाटील यांनी सेवा संपर्क कार्यालय येथे चालू असलेल्या रक्तदान शिबिरास आवर्जून भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.योगेश राजपूत, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.जितेंद्र जैन,भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री.जितेंद्र तायडे पाटील, भाजपा तालुका कोषाध्यक्ष श्री.किरण सरोदे, धाड शहराध्यक्ष श्री.विशाल विसपुते, भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष श्री.किरण पाटील धंदर, किसान मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष श्री.विलास पाटील पालकर, श्री.शालिग्राम कानडजे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे मा.तालुकाध्यक्ष श्री.डॉ.संतोष खेडेकर, श्री.अरुण भोंडे, श्री.बबन सुसर, श्री.संदीप शेळके, श्री.सिद्धू लडके, श्री.राजू अपार, मा.विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष श्री.गोपाल पाटील तायडे, श्री.मयूर पडोळ, श्री.अर्जुन पाटील लांडे,श्री.कृष्णा गोराडे श्री.आशिष देशमुख, विष्णू हिवरकर, श्री.सचिन कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.












