
आज महाराष्ट्र दीन आणि कमागर दिवस. कोरोना महमारीच सलग दुसर वर्ष आहे. या वर्षी कोरोना महमारीच्या दुसऱ्या लाटेने राज्यांत हाहाकार माजविला आहे. अनेक उद्योग धंदे बंद झाले आहेत. अनेक लोकांचे रोजगार बंद झाले आहेत. खूप जणांचे नोकऱ्या गेल्या आहेत.
अशा या भयानक परिस्थिती असताना मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील प्रगती फाउंडेशन मार्फत मदतीचे कार्य अहोरात्र सुरु आहे.

महाराष्ट्र दीन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून प्रगती फाउंडेशन मार्फत “मजदुर जगवा… ग्रामीण भारत जगवा” ही मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागांतील मजदुर कुटुंबांना अन्न धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये आदिवासी पाड्यातील मजूर, रस्ता बांधकाम मजूर, इमारत बांधकाम कामगार वर्ग तसेच घरकाम करणाऱ्या निराधार गरजू महिला कुटुंब इत्यादींचा समावेश होता.

“मजदुर जगवा… ग्रामीण भारत जगवा” या मोहिमेसाठी बँगलोर येथील ओम चारिटी फाऊंडेशन तसेच मुंबईतील श्री हरी हर पुत्र भजन समाज मंडळ या दोन संस्थांचे सहकार्य लाभले.

प्रगती फाउंडेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील जबाबदारी शिक्षक श्री बालाजी राठोड श्री हरिदास गंगथडे आणि श्री व्यंकट कागणे यांनी पार पाडली. पालघर जिल्ह्यातील जबाबदारी प्रणय ढमाळ आणि रामचंद्र मोकाशी यांनी पार पाडली. दोन्हीं जिल्ह्यातील मिळून एकूण साठ कुटुंबांना अन्न धान्य वाटप करण्यात आले. यात गव्हाचे पीठ, तांदुळ, तुर डाळ, हळद, मसाले, कांदे, कडधान्ये, तेल, साबण इत्यादि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. हा उपक्रम राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष किरण राणे आणि संस्थेचे मुख्य सल्लागार प्रो. आर आर. एस. मणी यांचे मार्गदर्शन लाभले.

येणाऱ्या काळात राज्यांत अनेक जिल्ह्यातून “मजदुर जगवा… ग्रामीण भारत जगवा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे असे संस्थेने म्हटले आहे. या स्तुत्य उपक्रमांसाठी राज्यांतील अनेक संस्थांनी, दानशूर व्यक्ती आणि संस्था यांनी सढळ हस्ते मदत करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किरण राणे व सौ. सिद्धी राणे यांनी केल.

सदर मदत करीत असताना सोशल डिस्टसिंग चे भान ठेवून कोरोना नियमांच काटेकोर पालन करण्यात आले.

https://www.facebook.com/286699648026002/posts/4448950395134219/











