भाजप खासदाराकडून ठाकरे सरकारचे कौतुक!

महाराष्ट्रातील आव्हानात्मक कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कौतुक केलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (१ मे) थोड्याच वेळापूर्वी याबाबतचे ट्विट केले आहे. “राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावल्याबद्दल ठाकरे सरकारला शाबासकीची थाप मिळायला हवी. मला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात हॉस्पिटलही आता सज्ज झालेली आहेत.”

महाराष्ट्रातील कोरोनास्थिती अशीच पुढेही स्थिरावत गेली तर ठाकरे सरकार शाबासकीची मोठी थाप मिळण्यास पात्र आहे”, असेही पुढे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यात कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडस निर्बंधांची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील आकडा कमी झाला नसला तरीही तो वाढलेलाही नाही. स्थिरावला आहे.