IPL 2021: दिल्लीचा पंजाबवर सात विकेट्सनी मोठा विजय

आयपीएलच्या (IPL) 29 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) नेतृत्वातील पंजाब किंग्सला (Punjab Kings) 7 विकेटने धोबीपछाड दिला आहे.

पंजाब किंग्सने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 167 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 17.4 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून जबरदस्त विजय मिळवला आहे. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाच्या विजयाचा नायक ठरला. धवनने सर्वाधिक 69 धावांची नाबाद खेळी केली. शिवाय, पृथ्वी शॉने 39 धावा आणि कर्णधार रिषभ पंतने 24 धावा केल्या.

शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) 16 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, फलंदाजांप्रमाणे पंजाबचे गोलंदाजही आजच्या सामन्यात काही प्रभावी कामगिरी करू शकले नाही. रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन आणि हरप्रीत ब्रारला प्रत्येकी 1 विकेट मिळाली