Election: ममता दीदींनी बंगाल जिंकले

तामीळनाडूत सत्तांतर होऊन द्रमुकची सत्ता आली आहे. केरळमध्ये ‘एलडीएफ’आणि आसाममध्ये भाजपची सत्ता कायम

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज इतिहास घडविला. कोरोनाची दुसरी लाट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातून अख्खी फौज प्रचारात उतरली. मात्र, ममतादीदींनी आपला शब्द खरा करीत एका पायावर बंगाल जिंकले.

तब्बल 216 जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळविले. भाजप दोन आकडी जागांमध्येच आटोपली.

दरम्यान, तामीळनाडूत सत्तांतर होऊन द्रमुकची सत्ता आली आहे. केरळमध्ये ‘एलडीएफ’आणि आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहिली आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामीळनाडू ही चार राज्ये आणि पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.

मात्र, देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालाकडे होते. भाजपने अत्यंत प्रतिष्ठsच्या केलेल्या निवडणुकीत आपली सर्व ताकद पश्चिम बंगालमध्ये पणाला लावली होती. देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, गृहमंत्री अमित शहा यांचे रोड-शो सुरू होते