नवी मुंबईत येत्या शुक्रवारी 3 जुलै मध्यरात्री पासून संपूर्ण लॉक डाऊन

कोरॉनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवी मुंबईत 3 जुलै मध्यरात्री पासून दिनांक 13 जुलै पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. वाशीतील ए पी एम सी मार्केट जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सुरू असणार आहे.

या दहादिवसाच्या लॉक डाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने व कार्यालये सुरु राहणार आहेत. सर्व प्रकारच्या खाजगी वाहनावर बंदी घालण्यात आली आहे. कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव होत आहे आणि म्हणून कोरोना साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉक डाऊन तसेच सर्वेषण मोहीम व औषध फवारणी करणार असल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.