प्रगती फाऊंडेशन आणि हुकमिल लेन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लोअर परळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर

खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन, 140 दात्यांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान

हुकमिल लेन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ना. म. जोशी मार्ग , डीलाईल रोड, लोअर परळ, मुंबई याठिकाणी प्रगती फाउंडेशन मुंबई आणि हुकमिल लेन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लोअर परळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार 23 मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना महामारी मुळे सध्या राज्यात रक्तासाठा अपुरा पडत आहे त्यामुळे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत आजचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.


सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत 100 बाटल्या रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट दुपारी एक वाजता पूर्ण झाले.


शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि बघता बघता शिबिर संपेपर्यंत जवळपास 140 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. याचाच अर्थ 140 रक्तदात्यानी आज श्रेष्ठ दान केले आहे.


रक्तदान केल्यानंतर दात्याला आयोजकांकडून प्रमाणपत्र सोबत विशेष भेट वस्तू देण्यात आल्या यामध्ये पाण्याची बॉटल, स्टिमर, फेस मास्क, फ्रुटी पेय, आरोग्यवर्धक सफरचंद इत्यादी अनेक वस्तूंचा समावेश होता.

कार्यक्रमात उपस्थित सर्वांसाठी अल्पोहरची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मय चव्हाण यांनी केले होते.

शिबिरात प्राणवायू चे महत्व जनसामान्यांना कळावे या हेतूने ऑक्सीजन प्लांट (तुळशी रोपे) वाटण्यात आले तसेच कोरोना पासून बचाव करण्यासाठी लसीकरण (Vaccination) महत्त्वाचे आहे याबाबत जन जागृती करण्यात आली होती.


शिबिराचे उद्घाटन खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते झाले. स्थानिक मा. आमदार सुनिल शिंदे, आशिष चेंबुरकर- वरळी विभाप्रमुख , माजी आमदार सचिन अहिर, सूर्यकांत भोईटे, राम साळगावकर, निशिकांत शिंदे, जेष्ठ शिवसैनिक भाई शेट्ये व अशोक निकम, ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांनीही विशेष उपस्थिती लावून तरुणांचे मनोधैर्य उंचावले.

सामाजिक अंतराचे भान ठेवून तसेच Covid 19 ची नियमावली पाळून सदर रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास अनेक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांचे सहकार्य लाभले. शाखाप्रमुख गोपाळ खाडये यांनी भेटवस्तू प्रायोजित करून विशेष सहकार्य केले. शिवशक्ती उत्सव मंडळ व बोरीचाळ गणेश उत्सव मंडळ यांचे कार्यकर्ते ही मोठया संख्येने उपस्थित होते. आय टी एम, ट्रायडन्ट टेक्निकल रिसोर्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री हरिहरपुत्रा भजन समाज मंडळ आणि युवा प्रगती सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाले होते.


प्रगती फाऊंडेशनचे चिन्मय चव्हाण यांच्या सोबत हुकमिल लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पदाधिकारी इत्यादींनी शिबिराचेे आयोजन यशस्वी होण्याकरिता विशेष मेहनत घेतली होती.