
कोरोनाच्या दुसऱया लाटेने अनेक राज्यांमध्ये कहर माजविला. महाराष्ट्रातही सुरुवातीला रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने प्रभावी उपाययोजना करून कोरोनाची दुसरी लाट रोखली.
देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची कामगिरी सर्वोत्तम आहे. एका सर्वेक्षणात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिल्या पसंतीची 62.5 टक्के मते मिळाली आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत.
ज्येष्ठ पत्रकार, ‘आजतक’ या वृत्तवाहिनीवरील ‘सीधी बात’ या टॉकशोचे प्रसिद्ध ऍन्कर प्रभू चावला यांनी ट्विटवर एक पोल घेतला होता. त्यात त्यांनी कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोणत्या मुख्यमंत्र्यांचे काम प्रभावी आहे? असा प्रश्न विचारला होता. या पोलला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. यात प्रथम क्रमांकाची मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक 62.5 टक्के मिळाली. दुसऱया क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून, त्यांना 31.6 टक्के मते मिळाली. तिसऱया स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के लोकांनी पसंती दिली. तर चौथ्या क्रमांकाची 1.3 टक्के मते केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना मिळाली आहेत.










