
लॉक डाउन असतानाही ५७ रक्तदात्यांची हजेरी, ४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
नवी मुंबई (प्रतिनिधी) : आज रविवार दिनांक २३ मे २०२१ रोजी नेरुळ मधील संकल्प कॉमर्स क्लासेस येथे महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन मार्फत आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ४७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन आपले देश सेवेचे व्रत पुर्ण केले. शिबिरास ५७ रक्तदात्यांनी हजेरी लावली होती.

महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन (MCOA) च्या माध्यमातून एकूण ४० केंद्रांवर हा उपक्रम राबविण्यात आला असून १,३०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. लॉक डाऊन असल्या कारणाने शिबिराचे आगाऊ रजिस्टेशन करण्यात आले होते जेणेकरून सोशल अंतर पाळता यावे. तसेच कोरोनाचे सरकारने घालून दिलेले नियम अत्यंत चोख पद्धतीने पाळून शिबीर पार पाडण्यात आले असे संकल्प कॉमर्स क्लासेसचे संचालक गणेश भागाजी गोडसे यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र निर्माण सेना शार अध्यक्ष गजानन काळे, शहर सहसचिव अभिजीत देसाई, शिवसेना विभागप्रमुख व माजी पक्ष प्रतोद रतन मांडवे, उपजिल्हा अध्यक्ष नवी मुंबई कॉग्रेस कमिटी नवनाथ चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, नवी मुंबई शहर सचिव पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य स्वप्नील चव्हाण, प्रहार जनशक्ति पक्ष उलवे शहर अध्यक्ष हितेश शिंगरे, पारनेर तालुका शिक्षक संघाच्या वतीने भाऊसाहेब आहेर, आ. निलेश लंके प्रतिष्ठानचे नवी मुंबई सानपाडा शाखा अध्यक्ष नानाभाऊ निमसे, उलवे फार्मा कमिटी आणि वसंतराज पतपेढी आर्थिक सल्लागार समिती राजेंद्र नाईक आणि ज्ञानमंदिर क्लासेसचे प्रदीप झोरे सर यांनी शिबिरास हजेरी लावली.












