
20 व्या ग्रॅंड स्लॅम जेतेपदावर कोरले नाव
जागतिक क्रमवारीत अव्वल आणि सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने सलग तिसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
जेतेपदासह जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या 20 ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली.

अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत जोकोविचने बेरेटिनीवर 6-7, 6-4, 6-4, 6-3 असा विजय मिळवला. जोकोविचचं हे सलगं तिसरं विम्बल्डन जेतेपद आहे. 34वर्षीय जोकोविचच्या नावावर आता विम्बल्डन स्पर्धेची 6 जेतेपदं आहेत.
जोकोविचच्या नावे ऑस्ट्रेलियन ओपनची 9, फ्रेंच ओपनची 2, विम्बल्डनची 6 तर युएस ओपनची 3 जेतेपदं आहेत.
अटीतटीच्या लढतीत बेरेटिनीने त्वेषाने खेळ करत पहिला सेट जिंकला मात्र त्यानंतर चिवट खेळासाठी प्रसिद्ध जोकोविचने लौकिकाला साजेसा खेळ करत पुढचे तिन्ही सेट जिंकत बाजी मारली.
फोरहँड, बॅकहँड, स्लाईस, ड्रॉप, क्रॉसकोर्ट अशा भात्यातील प्रत्येक अस्त्राचा खुबीने उपयोग करत जोकोविचने बेरेटिनीला निरुत्तर केलं.











