
रवी कुमारने 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेववर मात करत अंतिम फेरी गाठली. रवी कुमारने अंतिम फेरी गाठून पदक निश्चित केलं आहे.
पहिल्या फेरीत रवी कुमारने दोन गुणांची आघाडी घेतली मात्र त्यानंतर सनायेवने रवीला चीतपट करत थेट आठ गुणांची कमाई केली. या धक्क्यातून रवीने एक गुण कमावला.
रवीने तीन गुणांची कमाई करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. सनायेवच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर रवीने सनायेवला चीतपट करत बाजी मारली.
खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारा रवी पाचवा कुस्तीपटू आहे.
कुस्तीमध्ये 86 किलो वजनगटात भारताच्या दीपक पुनियानं नायजेरीया अगियोमोरचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. यंदाच्या पदकांच्या प्रबळ दावेदारांमध्ये दीपक पुनियाचा समावेश आहे.











