
ॲड.सुनिल देशमुख यांच्या वर गुन्हा दाखल
सर्व प्रार्थनास्थळे देवालय खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंगळवार 17 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर दिंडी मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा तालुका अध्यक्ष ॲड.सुनील हासनराव देशमुख यांच्यासह आंदोलनात सहभागी भाजपा पदाधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल केले आहे.
श्रावण महिना हा हिंदू सन उत्सव सुरू होण्याची सुरवात समजला जातो श्रावण महिना संपताच गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, गौरी लक्ष्मी असे व इतर सर्व धर्मियांचे धार्मिक उत्सव हे सुरू होतात त्यात ग्रामीण भागात हे धार्मिक सण हे मंदिरात भजन, कीर्तन, सप्तहाः च्या माध्यमातून गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात साजरी करत असतात त्यात सलग तीन वर्षा पासून याला खंड पडला आहे. मविआ सरकार कधी दुसरी कधी तिसरी लाट सांगत धार्मिक स्थळे बंद ठेवत आहे त्या उलट मात्र सरकार मधील मंत्री पदाधिकारी मोठ्याप्रमाणात भरगच्च बैठका,सभा घेताताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता सरकारच्या कारभारावर नाराज असून आता त्यांच्या आस्था असलेल्या सणांवर बंदी आल्याने आक्रमक होताना दिसत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडी ने सर्व धर्मियांची श्रद्धास्थान असलेले प्रार्थना स्थळे खुली करावी यासाठी मोठे आंदोलन उभे केले आहे.
शासनाने सर्व क्षेत्रातील निर्बंध शिथिल केले. परंतु अद्याप पर्यंत सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंदच आहेत राज्यात सरकारने भाविकांसाठी प्रार्थनास्थळे खुली करावी या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिंडी मोर्चा काढण्यात आला टाळ-मृदंग वीणा घेऊन अभंग आणि भजन म्हणत शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु त्या उपरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले वास्तविक राज्य सरकारने सर्व क्षेत्रात आता सूट दिली आहे एकीकडे वाईन बार हॉटेल सुरू आहे. दुसरीकडे सर्व राजकीय मेळावे, सभा आणि मोठ मोठ्या ऱ्यल्या काढल्या जात आहे. यामध्ये कोरोना चा संसर्ग होत नाही आणि केवळ मंदिरे व प्रार्थना स्थळांमध्ये करुणा चा संसर्ग होतो का ? असा सवाल ॲड.सुनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. सरकारला दारू ची दुकाने सुरू ठेवायला हरकत नाही. मग प्रार्थनास्थळे सुरू करण्यावरच बंदी का ? राज्य सरकारने सर्व धरणे नागरिकांच्या भावना आणि श्रद्धेचा आदर करत सर्व प्रार्थना स्थळे, मंदिरे सुरू करावी अन्यथा आणखी शंभर गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही यापुढे देखील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख यांनी सांगितले.











