PF वरील व्याज घटले

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याची माहिती दिली. जीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात १० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. १ जुलैपासून ७.९ टक्के व्याज मिळणार आहे, असं अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होता.केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे.