
आगामी मासरुळ जिल्हापरिषद निवडणुकीच्या पूर्व तयारी निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुम्मी पंचायत समिती पदाधिकारी याचा मेळावा गुम्मी येथील देशमुख फार्म येथे नुकताच पारपडला आ. श्वेताताई महाले पाटील व मा आ विजयराज शिंदे यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी आ श्वेताताई महाले यांनी पदाधिकारी यांना संबोधित करताना ॲड.सुनिल हासनराव देशमुख यांच्या मागे खंबीर उभे राहण्याचे आव्हान केले.

तसेच पदाधिकारी यांनी सर्कल मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढा त्यांच्या समोर मांडला तोच धागा पकडत त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या जगातील सर्वात मोठ्या अधिकाराचा वापर करून आपल्या अडीअडचणीच्या काळात उभे असणाऱ्या सुनील देशमुख यांच्या सारख्या उच्च शिक्षित तरुणाच्या माघे आपली ताकतात उभी करून मुजोर आणि भ्रष्ठ सदस्य याला धडा शिकवावा कुठल्याही दबावाला अमिषाला बळीन पडता विकासाची धृद्दृष्टी असलेल्या सुनील देशमुख यांना आपली सेवा करण्याची संधी आपण द्यावी बद्दल हा नक्की असून मतदानाची लीड वाढवण्यासाठी खऱ्याअर्थाने आपल्याला काम करायचे आहे सध्या स्थितीत राज्य सरकार हे ” आम्ही तिघे भाऊ भाऊ मिळून मिसळून खाऊ खाऊ ” अशा प्रकारे चालू असून जनतेच्या हिताचा कुठलाच निर्णय यांनी आज पर्यंत घेतलेला दिसत नाहीये. शेतकरी राजा पासून ते उच्च शिक्षित तरुण हा या महा भकास आघाडी सरकारला व त्याच्या कारभाराला वैतागलेला आहे. राज्यात कामगार सुखी नाही महिलांवर अत्याचार वाढत आहे आणि सरकार मधील मंत्री मात्र वसुली मध्ये व्यस्त आहे.

येणाऱ्या काळात आपल्याला मासरुळ जिल्हापरिषद सर्कलचा दर्जेदार विकास करायचा असून आपण भाजपच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा अशे आवाहन त्यांनी केले. तर लोकनेते मा आ विजयराज शिंदे यांनी घोडा मैदान समोर असून आगामी काळात सर्व भ्रष्टाचार समोर येणारच आहे. कडवट, कट्टर, निष्ठावान व गड अशे शब्द वापरून कार्यकर्त्यांना कामाला लावायचे त्यांच्या जीवावर निवडून याचे आणि कार्यकाळ संपुस्तर त्यांच्या सुखात दुःखात उपस्थित नाही राहायचे कोणी कार्यकर्ता बोला कि त्याला धमक्या द्यायच्या असले प्रकार करून जनतेच्या पैशाची लूट करून घरे भरायचे प्रकार मासरुळ सर्कल मध्ये अनेक वर्षांपासून ठेकेदार जमातीचे करत आहे. या उलट सुनील बापू हे कार्यकर्ता हीच जात आणि कार्यकर्ता हेच नातेवाईक समजून प्रत्येकाच्या मदतीस पुढे असतात.
कोरोना काळात देखील देशमुख यांनी अति गरजू कुटुंबांना खाद्य किट वाट असो किव्हा गावात पिठाची गिरणी असो हे असे पुण्याचे काम ते गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सतत करत आहे. आपल्या कोणाला तुम्ही निवडून दिलेला उमेदवार या जागतिक महामारीच्या काळात तुम्हाला मदत करायला आलेला दिसला का ? तुमच्या सुखात दुःखात दिसले का ? त्यांचा फायदा तुमच्या गावाला झाला का ? अशा अनेक बाबीचा विचार करून आपण मतदान करावे गावातले भ्रष्टाचार जनतेला सांगावे ठेकेदार चोर है हे जनतेच्या समोर आणावे. व सुनील देशमुख यांच्या सारख्या कोरी पाटी असलेल्या निष्कलंक उमेदवाराला आपण निवडून द्यावे अशे आव्हान त्यांनी केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत भ्रष्टाचार मुक्त मासरुळ जिल्हापरिषद सर्कल करण्याच्या हेतूने कामाला लागण्याचे पदाधिकारी याना आव्हान केले. यावेळी प्रमुख उपस्थित मध्ये जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, दत्ता पाटील, प्रकाश पडोळ पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख, बुलडाणा विधी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन पवार गुम्मी पंचायत गटातील सर्व जेष्ठ भाजपा नेते उपस्थित यावेळी भाजपा पदाधिकारी रवी धनावत, प्रकाश दांडगे, दिगंबर राजगुरे, अनिल चांदा, अनंता डुकरे, संजय झुंबड, संजय चांदा, शाम राजपूत, गोपाल बारवाल अमोल बारवाल, विजय तायडे, जितेंद्र तायडे पाटील, गोपाल तायडे, सतीश तायडे, कलीम मामु, गुलाब पाटील तायडे, आकाश तायडे, मधुकर नरोटे, पंडित नरोटे, पंजाब नरोटे, सूर्यदेव काकडे, विठ्ठल नरोटे, योगेश नरोटे, रमेश भोपळे, चेतन भोपळे, विशाल राजपूत, कुंदन गायकवाड,अशोक गायकवाड, अमोल गायकवाड,दिलीप सुरोशे, संतोष जाधव, राजाराम पिंपळे पाटील, श्रीराम पिंपळे पाटील, गजानन देशमुख, भगवान पिंपळे, इंद्रनाथ माटे, सुभाष कदम, फिरोज बेग, अनिल देशमुख तसेच गुम्मी पंचायत समिती गणातील पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्तित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत यांनी केले तर आभार युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस धनवे पाटील यांनी मानले.











