
शेतकरी संघटनेचे नेते स्व.डॉ.हासनराव देशमुख साहेब यांच्या ४ थ्या स्मूर्थी दिनानिमित्त मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मधील सर्व गावां तील एस. टी महामंडळातील कामगारांना भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल हासनराव देशमुख यांच्या वतीने खाद्य किट वाटप करण्यात आली. डॉ.साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशमुख कुटुंब हे दर वर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात.
गेल्या ३ ते ४ महिन्या पासून एस. टी महामंडळा तीळ कामगारांचा त्यांच्या रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी बंद सुरू आहे त्यात कामगारांची सरकार च्या दांडेल शाही मुळे आर्थिक परिस्थिती ढासळली असून त्यांच्या परिवारावर वर मोठे संकट आलेले आहे.
कार्यक्रमा दरम्यान त्यांचे मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितले की मंत्रांच्याच गाड्या महामंडळात भाड्याने लावायच्या बस च्या सामानामध्ये भरमसाठ भाव वाढून अव्वाच्या सव्वा बिल काढायची अशे कारभार बंद होण्याच्या भीती पोटी हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या लालपरी व ग्रामीण भागातील जनतेचा श्वास असलेली एस. टी महामंडळा तील कामगारांना शासनात समाविष्ट करत नाहीये हे सरकार अलीबाबा चाळीस चोरांचे सरकार असून हे सरकार आल्या पासून कोणताच समाज सुखी नाही शेतकऱ्यांना सक्तीची वीजबिल वसुली, तरुणांना रोजगार नाही, विद्यार्थ्यांचे पेपर फुटी, नौकरी मध्ये आर्थिक घोटाळे, सर्वसामान्य लोकांकडून हप्ते वसुली, महिलांवर अत्याचार अशे अनेक प्रकार या काळात वाढले आहे असे मत उपस्थित कामगार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली तसेच येणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीच्या मतदानातून शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य जनता या तीन तिघाडे काम बिघाडे सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा निर्धार आता सर्वसामान्य जनतेने केलेला असून येणार काळ हा गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत लोकहिताचे निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारचेच असेल हे नक्की. तसेच उपस्थित सर्वांनी हिवाळी अधिवेशनात शेकऱ्यांचे, युवकांचे, विद्यार्थी व एस. टी. कामगारांचे प्रश्न उपस्थित लेल्या बद्दल आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांचे अभिनंदन करायची भावना देशमुख यांच्या कडे व्यक्त केली असता. ॲड.सुनिल देशमुख यांनी त्यांच्या फोनवरून मुंबईत अधिवेशनात असलेल्या आ.श्वेताताई महाले पाटील यांच्या सोबत एस.टी कामगारांचे बोलणे करून दिल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी उपस्थित शरद देशमुख, कैलास पवार, संजय देशमुख, अरुण बोडखे, अर्जुन लांडे पाटील, रामेश्वर आल्हाट, अंबादास अपार, अनिल गुळवे पाटील, नरवाडे बाबा, आकाश बोडखे, अंकुश सावळे, गणेश बोडखे, संतोष भगत, सुभाष आल्हाट, अनिल सोनुने, भानुदास आल्हाट, तुकाराम गुळवे, बबन आल्हाट, बाबुराव आल्हाट, नारायण सिनकर, छगन आल्हाट, उखरडा पवार, गजू आल्हाट, तुळशीदास आल्हाट, दिलीप पाखरे, दशरथ भगत, प्रमोद सिनकर, अंकुश उखर्डे, नारायण सावळे, नारायण सिनकर तसेच गावातील प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










