
जोहान्सबर्गच्या (Johannesburg) द वांडरर्स स्टेडियमवरील टीम इंडियाचा (Team India) विजयरथ यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) रोखला आहे. वांडरर्स स्टेडियम (Wanderers Stadium) हा भारतीय संघाचा ‘किल्ला’ मानला जात होता कारण गेल्या 26 वर्षांत टीम इंडियाने येथे एकही कसोटी सामना गमावलेला नव्हता. मात्र डीन एल्गरच्या (Dean Elgar) Proteas संघाने सात गडी राखून भारतीय संघाला (Indian Team) पराभवाची धूळ चारली आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. एल्गरने पुढाकाराने नेतृत्वात करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. तो 96 धावा करून अखेरीस नाबाद परतला. याशिवाय रॅसी व्हॅन डर डुसेनने 40 आणि टेंबा बावुमा 23 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, भारतासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि आर अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली, पण एल्गरच्या चिवट फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाज फ्लॉप ठरले.










