प्रदर्शित होणार टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती 2’

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tigar Shroff) ‘हिरोपंती’ (Heropanti) सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून लवकरच हीरोपंतीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टायगरच्या ‘हीरोपंती’ सिनेमात कृती सेनन मुख्य भूमिकेत होती. हीरोपंती 2′ (Heropanti 2) सिनेमात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया (Tara Sutaria) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमात टायगर  धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. सध्या तो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवरचा फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. ‘हीरोपंती 2’ ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.