
शेजार धर्म: अॅल्डरमिड लेन मधले राहुल, पारूल यांचे सख्खे शेजारी आणि कॅनडा
*अॅल्डरमिड लेन मधले राहुल, पारूल यांचे सख्खे शेजारी*
शेजार धर्म या शब्दाला भारतीय संस्कृतीत फार व्यापक अर्थ आहे.मुंबईतील चालीत राहाणाऱ्या अनेक कुटुंबानी साहित्यिकांना,चित्रपट निर्मात्यांना, नाटककारांना तर भुरल पाडली आहे.वानगीदाखल चाल नावाची वाचाल वस्ती,मुंबईचा जावई,शेजारी सारखे मराठी चित्रपट, सख्खे शेजारी नाटक आणि पु लं ची अजरामर झालेल्या बटाट्याची चालीने मराठी मनांचे भावविश्व अधिक विस्तारले आहे. या पाश्र्वभूमीवर मी राहुल कडे मिसीसागाच्या अॅल्डरमिड लेन मधील त्यांच्या शेजारच्यांची त्यांच्याकडे चौकशी केली. त्याने येथे फारसे भावनात्मक संबंध नसतात. साधारणत: हाय,हॅलो,प्रतिसाद चांगला मिळाल्यास एकमेकाची जुजबी माहिती जाणून घेणे. शेजारच्याकडे तुमच्या मुलांच्या समवयस्क त्यांचीही मुले तर जास्तीची जवळीक वाढते. मग मुलां मुलींच्या वाढदिवसानिमित्त बोलावणे यातून जवळीकीच्या कक्षा काहीशा रूदांवतात एवढेच! यालाही अपवाद असतोच. जर का भारतीय शेजारी असेल आणि त्यातही तो महाराष्ट्रीयन असला तर दुधात साखर प्रमाणे शेजार धर्मची वीण घट्ट होते.आज अशाच काही चार वेग वेगळ्या देशातील त्यांच्या शेजारच्यांची ओळख करून देत आहे.
मुळचा इटालियन असलेला, आता नवदीमध्ये प्रवेश केलेला आणि वीस वर्षांपूर्वीच त्याच्या प्रिय पत्नीने अखेरचा श्वास घेतल्यानंतर शासकीय जेष्ठ नागरिकासाठी असलेल्या सोयी सुविधाचा लाभ न घेता एकटाच राहात आहे.स्वताच्या गरजेनुसार अन्न पदार्थ तयार करतो बरेचदा होम डिलिव्हरीने हवे ते मागवतो. अत्यंत शांतपणे बागकामात, घरकामात, संगीतात रमून जातो.त्याची आणि माझी व उषाची ओळख राहुलने करून दिली आणि मग मी टोनीशी आमच्या फावल्या वेळात गप्पा रंगत आहेत.
दुसरा शेजारी हा जपानी आहे.उगवत्या सुर्याच्या या देशाचा मला फारच आर्कषण! मी अलिबागच्या जे एस एम काॅलेजमध्ये जेव्हा प्राध्यापकी करीत होतो तेव्हा जपानचा इतिहास अतिशय तपशीलवार पणे शिकवीत असे.पुणे विद्यापीठात शिकत असताना माझ्या मियासाका मित्राकडून कामापुरती किंवा कामचलावू जपानी शिकलो होतो.तर या जपानी शेजार्याची ओळख करुन दिल्यावर त्याला मी *मोशी मोशी ,ऑरीगातो गोजाईमास* म्हणून जपानी पध्दतीने अभिवादन केले आणि *निहीयोगी कोशी कोशी गोजारीमास*म्हटल्यावर त्याची कळी खुळली.याचे चौकोनी कुटुंब, मुलगी जिम्नॅस्टिक, मुलगाही स्पोर्ट्समन्,मिसेस एअर होस्टेस.( हॅलो,गुडमॉर्निंग, मलाही मोडकी तोडकी जपानी येते ) त्याची मुलगी आणि माझ्या नाती अवनी नीवा सायकलिंगला जात असतात म्हणून थोडा घट्टपणा अधिक.
तिसरा शेजारी आहे मेक्सिकन! दोघेच नवरा बायको.मिस्टर निवृत्त तर मिसेस आठवड्यातून तीन दिवस हेअर कटिंगचे काम करण्यास स्वत कार चालवित जाते.या वयातील तिची चपळाई अचंबित करते.हे हाय हॅलोच्या आणि स्मित देण्यापलीकडे जातच नाहीत.
चौथा शेजारी आहे इराकी. ह्याचा स्लायडिंग विंडोचा व्यवसाय आहे.भरगच्च कुटुंब आहे. कॅनडाची लोकसंख्येत भर घालण्यात त्यानी आपल्या परीने योगदान दिले आहे.तीन मुलगे,दोन मुली सर्वच आता मॅरीड,जावईसह,आणि त्यांच्या मुलामुलींसह ते एकत्रच राहातात. मी या कुटुंबाशी फारशी जवळीक साधलेली नाही पण गुडमॉर्निंग होतेच.ते सर्वजण त्यांच्या उद्योगात व्यस्त असतात.
माझा स्वभावा प्रमाणे हे विश्वच माझे घर समजून आणि बंधूभाव हाच धर्म समजून प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन










