मला भावलेला शांतताप्रिय कॅनडा: डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – ११

कॅनडातील विविधते मधून दिसणारी एकात्मका

कॅनडात सध्याची रूजलेली संस्कृती रूढ अर्थाने पाहिले तर ती संमिश्र स्वरूपाचीच आहे.येथे आणखीन एक बाब लक्षात येते कि युरोपियन येथे येण्यापूर्वी मुळनिवासी लोकांची जी संस्कृती होती ती आपल्या भारतीय आदिवासीं संस्कृतीच्या खूपच मिळती जुळती आहे.

Candian Flag

कॅनडाच्या राष्ट्रीय ध्वजात लाल मेपलचे पान आहे ज्यात अकरा टीप आहेत आणि या वृक्षा बद्दल कॅनडीयन नागरिका प्रती आदराची भावना आहे.येथे मॅपलचे घनदाट जंगल असतात त्यातून साखर निर्मीतीचा एक स्रोतही आहे.

कॅनडाच्या इतिहासाची पाने वाचताना त्याच्या प्रदीर्घ इतिहासात शस्त्रास्त्रांचा कोट अनेक वेळा बदलत गेला आहे.कोट आमर्समध्ये राज्यव्यवस्थेचे प्रतिक म्हणून एक मुकूट, एक क्रेस्ट, हेल्मेट आणि पांढऱ्या व लाल मेपलच्या पानाखाली एक रूपरेषा चार देशांच्या प्रतिकासह पांच भागांची हेराल्डिक ढाल आहे.जे आधुनिक कॅनडाचे ( इंग्लंड, फ्रान्स, स्कॉटलंड, आर्यलंड ) चे प्रतिनिधित्व करतात म्हणून मेपल वृक्ष एकतेचे प्रतिक झाले आहे. कॅनडायिन लोकाच्या शर्टाच्या बाहीवर रिबनचा जो मुकूट रेखाटला जातो त्याचा लॅटिन मधील अर्थ *त्याना एक चांगला देश हवा होता* असा होतो आणि आता तो मिळाला आहे.

येथील काही आम जनतेसाठी असलेल्या काही मुलभूत सोयी सुविधांवर एक नजर टाकू या!

Toronto Pearson International Airport

प्रथम वाहतूक व्यवस्थेबद्दल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासा करीता एकूण तेरा विमान तळ आहेत मुख्य विमानतळ टोरांटोत असून त्याला टोरांटो पिअर्सन म्हणतात त्यालाच रेल्वेमार्ग, बसस्थानकेही जोडली आहेत.तसेच युनायटेड स्टेट्सच्या रेल्वेमार्ग व बसस्थानकांचे कनेक्शनचा समन्वय राखण्यात आला आहे.सागरी किनारपट्टीवर फेरी बोटीने सुखदायक आरामशीर प्रवासाची सुविधा आहे.रेल्वेमार्गाचेही व्यापक नेटवर्क आहे.येथे नियमित बस सेवा जोडीला मेट्रो आहेच.तरीदेखील बहुतांशी लोक आपल्या स्वताच्या कारनी प्रवास करणे पसंत करतात.

कॅनडात जगातील सर्वच देशातील लोक वास्तव्यास आले आहेत त्यामुळे स्थलांतरितांची संख्या वाढतच आहे तरीही येथे येऊन स्थायिक होणारे सर्वजण कॅनडीयन नियमाच्या चौकटीत राहून एकमेकाच्या संस्कृतीचा आदर राखून राहात आहेत.

कॅनडाने जगाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध राॅक,पाॅप,फोक, आणि जाझ संगीतकार दिले आहेत. त्याच प्रमाणे चित्रपट इंडस्ट्रीतही भरीव योगदान दिले आहे.टोरांटोत आणि ओटावात अनेक नामांकित फिल्म मेकिंग संस्था आहेत.आता तर राष्ट्रीय चित्रपट परिषद स्थापन झाली आहे.

थोड्याच अवधीत कॅनडाने डाॅ चेबीस,डाऊन द रोड,माय अंकल अॅटोनी,असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट निर्माण केलेत.आपल्या कडे वाराणशी मध्ये वाॅटर सिनेमाच्या चित्रकरणास विरोध झाल्यावर त्या चित्रपटाचे चित्रीकरण कॅनडातच झाले होते.

Canadian Ice Hockey League

कॅनडात आईस हाॅकी, फूटबॉल, कर्लींग, स्केटिंग हे खेळ अत्यंत लोकप्रिय आहेत आणि लोकही सर्वच खेळांप्रती आस्था राखून आहेत. ऑलिंपिक मधली कामगिरी उल्लेखनीय आहे.माॅन्टरियल मध्ये कॅनडाने यशस्वी आयोजन केले होते.

Canda Confederation Bridge

जगातील सर्वात तेरा कि.मी.लांबीचा कन्फेडरेशन ब्रिज बर्फाच्छादित पाण्यावर कॅनडाने बांधला आहे.टोरांटोत 555 मीटर उंचीचा ( दुसर्‍या क्रमांकाचा ) C B N टाॅवरची निर्मीती केली आहे.या टाॅवर वरून टोरांटो शहराचे विलोभनीय दर्शन होते.आणखीन एक द ग्रेट लेक्स हे ताजे न गोठणारे पाण्याचे सर्वात मोठे स्रोत आहे तसेही कॅनडाला सरोवराचा देशही म्हटले जाते.स्टॅम्प डे हा उन्हाळ्यातील सण अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करून कॅनडाची विविधतेतील एकतेचे दर्शन घडवितात.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन