
मिसीसागातील जीवनशैली,राहाणीमान आणि एका कुटुंबाचा खर्च ( भाग 4 )
आज रविवार. सारे कसे सुशागत.कोणालाच घाई गडबड नव्हती.पारूल, राहुल कालच्या लाॅग ड्रायव्हिंग नतंर उशिरापर्यंत विश्रांती घेणार होते. मी माझी येथील दिनचर्या सुरू करून वाॅक साठी बाहेर पडलो होतो.
शेजारी मेक्सिकोच्या मुलानी लाॅन कटिंगचे काम सुरू केले होते.हाय,हॅलो झाले.त्यांनी गप्पांचा फड जमविल्यावर अस्मादिक थोडाच काढता पाय काढणार! राहुल, पारूलची आणि अवनी विषयी भरभरून बोलत होता. त्याचा मुलगा स्वतंत्र राहात असल्याचे सांगितलै.
आज राहुल कडे लाॅन कटिंग आणि झाडांच्या बुध्यांना मल्च ( लाकडाचे मशीनने बारीक तुकडे करुन त्याला धुरी दिली जाते आणि हा खत वजा मल्टीपल उद्देशाने वापरतात. त्यामुळे इतर गवताची वाढ होत नाही बर्फवृष्टी वेळी झाडाच्या आजूबाजूच्या मातीचेही संरक्षण होते.
ह्या गार्डनच्या कामास आलेले दोघे जण उच्च शिक्षित आफ्रिकन विद्यार्थी होते. गार्डनची कामे करून ते अर्थार्जन करीत होते त्यातील एकाचे नाव कोबी.खूप बोलका. त्याला भारतीय राजकारणाची,येथल्या समाज जीवनाची चांगलीच समज होती.तो त्याची कामे करून माझ्याशी बोलत होता. माझी त्याच्या बरोबरची चर्चा चांगलीच रंगली. त्यानी मला त्यांनी आणलेला पिझ्झा शेअर करण्याची विनंती केली.पण मला बाहेर माॅल मध्ये खरेदी साठी जायचे होते म्हणून त्याचे आभार मानून निघून गेलो.
येथे रविवारचा उपयोग लंचपर्यंत साफसफाई, घरकाम,लाॅड्रींग किंवा घरात लागणाऱ्या वस्तुंची खरेदी,तिकडेच हाॅटेलमध्ये लंच!मग रात्री उशिरापर्यंत मनपसंत भटकंती. हे कॅनडातील निवासी रसिकतेनी जीवनाचा आनंद घेत आहेत. जगा,शांतपणे आणि फेसाळलेल्या लाटेगत एन्जॉय करा,हाच त्यांचा सिंपल फंडा आहे.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











