प्रगती फाउंडेशन आणि लोकमत यांच्या सौजन्याने IVY पुरस्कृत म्युझिक टॅलेंट चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेते जाहीर

प्रगती फाउंडेशन आणि लोकमत यांच्या सौजन्याने IVY पुरस्कृत म्युझिक टॅलेंट चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेते जाहीर, वाशी येथे पार पडला भव्य कार्यक्रम .

उगवत्या नव कलाकारांना गायन, संगीत आणि नृत्य क्षेत्रात कला सादर करण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि म्युझिक अकॅडमीना सपोर्ट करण्याकरिता म्युझिक टॅलेंट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी वाशी नवी मुंबईतील विष्णु दास भावे या सभागृहात करण्यात आले होते.

IVY या कंपनीच्या सामजिक दायित्व योजनेतून प्रगती फाउंडेशनच्या वतीने लोकमतच्या सहकार्यातून पार पडलेल्या या कार्यक्रमात गायन, संगीत आणि नृत्य या तीन प्रकारांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला होता. इच्छुक स्पर्धकांनी ऑनलाईन पद्धतीने ऑडिशन दिलं होतं आणि आयोजकांकडून तीनीही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामवंत पंचांच्या माध्यमातून स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रत्येक विभागात पाच टॉपच्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी आणि अंतिम विजेतेपद पटकावण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.

गायन विभागात प्रसिद्ध कलाकार प्रसाद चव्हाण (उर्फ प्रसाद लारा) आणि सोनम अहिर, नृत्य विभागात प्रसिद्ध कलाकार, लावणी सम्राट अभिनेता आशिमिक आनंद कामठे तसेच संगीत वाद्य (तबला वादक) विभागात प्रसिद्ध तबला वादक राजाराम शिवलिंगन व गुरुनाथ पाटील यांनी पंच म्हणून भुमिका पार पाडली.

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष किरण राणे आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली. त्यानंतर निलेश वाहलेकर यांनी गणेश वंदना गायली व रिदम डान्स अकॅडमी यांनी स्वागत नृत्य सादर केले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच कलाकारांनी दर्जेदार कलेचे सादरीकरण केले आणि उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केलं व मन जिंकले. संगीत, गायन आणि नृत्य अशा तीनही कलांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

म्युजिक टॅलेन्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत गायन विभागात अथर्व बक्षी याने प्रथम, स्वरा बनसोडे हिने द्वितीय आणि अंशिका पांडे हिने तृतीय पारितोषिक पटकावले.

संगीत विभागात (तबला वादक) विषेश सुर्वे याने प्रथम, अर्चित गायकवाड याने द्वितीय आणि श्रीराज उत्तेकर याने तृतीय पारितोषिक पटकावले.

नृत्य कला (सोलो डान्स) विभागात मृण्मयी भरमाल हिने प्रथम, सौंदर्या आइंच्वार हिने द्वितीय आणि सानवि भिलारे हिने तृतीय पारितोषिक पटकावले.

नृत्य कला (ग्रुप डान्स) विभागात क्लासिक डान्स अकॅडमी ग्रुप यांनी प्रथम, रिदम डान्स अकॅडमी ग्रुप नंबर २ यांनी द्वितीय आणि रिदम डान्स अकॅडमी ग्रुप नंबर १ यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.

गायन विभागांतील विजेत्या स्पर्धकांना झी मराठी वाहिनीवर सारेगमपा लिटल्स चॅम्प या स्पर्धेसाठी संस्थेच्या वतीने शिफारस करण्यात येणार आहे.

म्युजिक टॅलेन्ट चॅम्पियनशिप 2022 अंतिम स्पर्धेतील सर्व विजेत्यांना लोकमतचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले.

प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष किरण राणे, उपाध्यक्ष धर्मवीर सिंग अरोरा, खजिनदार पवनप्रीतकौर दुग्गल, सल्लागार सलीम पटेल, राणी देवकर, समाज सेवक सिद्धार्थ साळवी, प्रकाश ढसाळ, अंकुश नलावडे, ओमकार वंडेकर, डॉ प्रीती देशपांडे, चिन्मय चव्हाण, सुहास पांचाळ, सुभाष लेंडवे, राकेश वाणी, प्रणय ढमाळ आदि मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

कार्यक्रमात स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रसिद्ध बॉलिवूड फेम विनोदवीर प्रशांत राव आणि प्रगती फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका सौ सिध्दी किरण राणे यांनी केले.