
सोविएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध स्पर्धेतून मानवाचे चंद्रावर पडले पहिले पाऊल!
आजच्या लेखात मानवी ईर्षा कशी प्रबळ ठरते आणि त्यातून अभूतपूर्व, जगाला थक्क करून सोडणारी चंद्र मोहीम यशस्वी कशी ठरली याविषयीची माहिती तुमच्याबरोबर शेअर करू इच्छित आहे.
मी अमेरिकेतील न्यूजर्सी येथे 2012 मध्ये माझे मित्र इतिहास प्रेमी आणि सुप्रसिद्ध लेखक डाॅ.सर्जेराव देशमुख (नासामधून निवृत्त झालेले) यांच्या आमंत्रणा वरून प्रथम भेट दिली. त्यावेळी अमेरिकेची राजधानी वाॅश्गिटन डी.सी. येथे भेट दिली होती. तेथे चंद्रयान मोहीम सुरूवातीपासून ते नील ऑर्मस्ट्रांग यांनी पहिले पाऊल ठेवले त्याबाबतचे अत्यंत बारकावे,तपशील, त्यात वापरण्यात आलेले यान,चंद्रावरून आणलेले माती आणि इतर नमुने असंख्य छायाचित्रणे पाहाण्याचे भाग्य मला लाभले. माझे वास्तव्य सध्या बफेलो ग्रोव्ह, लेक काऊंटी मध्ये माझा मोठा मुलगा राहुल कडे आहे तर येथून न्यूजर्सी बायरोड बारा तासांच्या अंतरावर! त्यामुळे आमचे फोन वरून संपर्क होतो. आणि आजच्या गप्पाष्टाकात चंद्रयान प्रदर्शन पाहिल्याचा विषय निघाला . मग ते प्रदर्शन पाहिल्याचे आठवले. त्याचे शब्दांकन करीत आहे.सत्तरीच्या घटनेला जगाला विस्मित करण्याऱ्या उजाला देत आहे.
रशिया आणि अमेरिकेतील शीतयुद्ध बहुश्रुत आहे.*हमसे बढकर कोई नही* या भावनेतून दोन्ही देशांत प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा. त्यातून अवकाशही आलेच. रशियाने 1957 साली स्पुतनिक कृत्रिम ग्रह प्रथम सोडला , 1961ला युरी गागरीनने अंतराळात झेप घेऊन पृथ्वीभोवती 89 मिनिटात प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यामुळे अमेरिकेन जनतेला आपण फार मागे पडलोत असे वाटू लागले.यावेळी जाॅन एफ केनेडी राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी जनभावना ओळखून * *वी चूज टू गो टू द मून* आम्ही चंद्रावर जायचं ठरवलंय असे जाहीर केले.
मग नासाने अपोलो मोहीम हाती घेतली 4 लाख लोकानी काम केले खर्च होता 25 बिलियन डॉलर्स. बझ ऑल्ड्रीन,नील ऑर्मस्ट्रांग व मायकेल काॅ लीन्स यांची निवड होऊन त्यांना कठोर ट्रेनिंग देण्यात आली. पृथ्वी सोडल्यावर 110 तासानंतर 20 जुलै 1969 रोजी नील ऑर्मस्ट्रांगनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आणि एक इतिहास घडला. त्यानंतर बझ ऑल्ड्रिंग उतरला मायकेलनी मॉड्युल कंट्रोल केले. अमेरिकेचा झेंडा फडकविण्यात आला. चंद्राच्या पृष्ठभागावरील माती, इतर नमुने गोळा करून काही वैज्ञानिक प्रयोग पुर्ण करुन यशस्वी रित्या पृथ्वीवर परतले.

जेव्हा अमेरिकेने चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली होती.सारे जग अचंबित झाले होते.मानवी बुध्दीमत्तेनी चंद्रावर झेप घेतली होती त्यामागे शीतयुद्धामुळे निर्माण झालेली ईर्षाच कारणीभूत होती असे मला ठामपणे वाटत आहे.याचे वर्णन That’s one small step for man one giant leap for mankind असे करण्यात आले होते.डाॅ. सर्जेराव देशमुख सोबत असल्याने त्यांनी विशद करून अधिक समजावून दिल्याने आठवणीच्या कप्प्यात चिरस्मरणीय राहिले आहे.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.











