समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनां

समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा

अलिबाग,दि.23 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागांमार्फत सन 2022-2023 या वर्षाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. इच्छुक व पात्र ग्रामीण भागातील महिला बचतगट, महिला भजनी मंडळ, पात्र मुली व महिलांना तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय बचतगटांनी संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत अर्ज सादर करण्याबाबत रायगड जिल्हा परिषदेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.

*योजनेचे नाव:-*

1) महिला भजनी मंडळांना भजनाचे साहित्य पुरविणे, *या योजनेकरिता पात्रता:-* ग्रामीण भागातील भजनी मंडळ असावे,

2) महिला बचतगटांना पापड मशिन पुरविणे,

3) महिला बचतगटांना दळन मशिन पुरविणे,

4) महिला बचतगटांना टेबल, खुर्ची, लोखंडी कपाट पुरविणे,

5) महिला बचतगटांना सतरंजी पुरविणे, *या योजनांकरिता पात्रता:-* ग्रामीण भागातील महिला बचतगट असावा,

6) इयत्ता 5वी ते 12 वी पर्यंत शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे,

7) महिलांना साहित्य पुरविणे (शिलाई मशिन/पिको फॉल मशिन/ॲमरेडी मशिन (नक्षीकाम))

*या योजनांकरिता पात्रता:-* ग्रामीण भागातील मुलींना व महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना,

*अर्ज कोणामार्फत सादर करावा:-* बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना,

*अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:-* दि.15 ऑक्टोबर 2022.

*योजनेचे नाव:-*

1) मागासवर्गीय वस्तीत व वस्तीवर जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकार योजना

2) मागासवर्गीयांसाठी अनुदानित वसतिगृहांना सोयी सुविधा पुरविणे (सतरंजी व चादरी पुरविणे),

3) मागासवर्गीय वस्तीतील समाजमंदिरास खुर्ची पुरविणे,

4) मागासवर्गीयांना समाजमंदिरास सतरंजी पुरविणे,

5) मागासवर्गीयांच्या व्यायामशाळांना साहित्य पुरविणे,

6) सामूहिक व्यवसायासाठी मंडपाचे साहित्य पुरविणे

7) संगणक/शिलाई मशिन/ड्रायव्हींग/बांबू फर्निचर प्रशिक्षणासाठी सहाय्यक अनुदान,

8) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप पुरविणे,

9) मागासवर्गीय युवकांना वेल्डिंग कामासाठी मशिन पुरविणे,

*अर्ज कोणामार्फत सादर करावा:-*  पंचायत समिती गटविकास अधिकारी, *अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:-* दि.15 ऑक्टोबर 2022.

इच्छुकांनी या योजनांचा लाभ घेण्याकरिता दि.15 ऑक्टोबर 2022 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) तथा जिल्हा परिषदेचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी नितिन मंडलिक यांनी केले आहे.