डॉ भास्कर धाटावकर लेखमाला: पुराभिलेख विभागाचे महाराष्ट्रातील मोडी प्रशिक्षण यशस्वी अभियान….- भाग 20 (2)

पुराभिलेख विभागाचे महाराष्ट्रातील मोडी प्रशिक्षण यशस्वी अभियान….

राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीने जुन्या लिपींचा पुर्नजिवन करण्यांचा ठराव औरंगाबाद येथील अधिवेशनात 1969 साली पारीत झालेला ठराव माझ्या जुन्या फाईल्स चालत असताना वाचण्यात आला. सन होते मार्च 1984. यावेळी माझ्याकडे पुराभिलेख विभागाच्या संचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. काहीतरी चाकोरीबाहेर उपक्रम राबून पुराभिलेख विभाग लोकाभिमुख करावा अशीच माझी सततचे प्रयत्न असत. हे मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे कारण म्हणजे मोडी वाचन करणारे पंतोजी, काळाच्या ओघात पडद्याआड झाले होते. महाराष्ट्राच्या इतिहासाची योजना अव्वल साधने मोडी लिपीत पण तीच मोडीत निघालेली म्हणून मी तिचे पुर्नजिवन करण्याचे तयार ठरवून योजना तयार करून शासनाची रितसर परवानगि घेऊन पहिले प्रशिक्षण वर्ग पुण्यामध्ये आयोजित केले आणि त्याचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांच्या शुभहस्ते झाले आणि या पहिल्याच प्रयोगाला चांगलाच प्रतिसाद मिळून यशस्वी झाला. वृत्तपत्रातूनही चांगली प्रसिद्धी मिळाली.
ही योजना अल्पजीवीच ठरली.तिला प्रशासकीय लाल फितीमुळे अडचणी निर्माण झाल्या. पण पुढे 2002 साली माझी संचालक पदावर नेमणूक झाल्यानंतर मी या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाची नव्याने मांडणी करून तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री अशोक चव्हाणसाहेब यांच्याकडून रितसर मान्यता घेऊन हे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.त्याचे उद्घाटन श्री चव्हाणसाहेबांनी मुंबई विद्यापीठाच्या भव्य अशा दीक्षांत सभागृहात संपन्न झाले. या पहिल्याच वर्गासाठी 120 प्रशिक्षणार्थीने भाग घेतला. सुप्रसिद्ध मोडी प्रशिक्षक मनोहर जागुष्टे यांना आमंत्रित करून अनेक मोडीलिपी तज्ञांशी चर्चा करून आम्ही अभ्यासक्रम ठरविला.मोडीलिपीतील पुस्तकांचे संपादन केले. प्रशिक्षक आमच्या अभिलेखागारातील मोडी शाखेतील कर्मचारी व जागुष्टे होतेच. महाराष्ट्रातील एकूण एक जिल्ह्यात 55 प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले त्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्य़ाचाही समावेश होता. 5000 हून अधिक मोडी लिपी लेखन, वाचन करणारे तयार करण्यात आले.या प्रशिक्षणार्थीची शंभर मार्काची परीक्षा घेतली जात असे. उत्तीर्ण झाल्यावर पुराभिलेख विभागाचे प्रथम शासकीय प्रमाणपत्र देण्यात येई.आणि विशेष म्हणजे आम्ही महाराष्ट्रातील सर्वच शासकीय कार्यालयाना या प्रमाणपत्र धारकांनी मोडी दस्तावेजाचे लिप्यंतर केलेले मान्य करावे असे पत्रकच काढले होते. त्यामुळे कित्येकांना आर्थिक उत्पन्नाचे एक स्रोत मिळाले. पुराभिलेख विभागात नवीन भरती साठी आमचे प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल असे आम्ही जाहिरातीत प्रसिद्ध करीत होतो.

हे प्रशिक्षण वर्ग 12 ते 15 दिवसांचे असत. उदंड प्रतिसाद! पुण्यातील स.प.महाविद्यालयातून मी इतिहास विषयात पदवीधर झालो होतो. त्यामुळे काॅलेजने मला मोफत दोन वर्ग आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.( असे वर्ग आणि सुविधा महाराष्ट्रभर अनेक नामांकित संस्था, काॅलेज यांनी पुरविल्या होत्या ) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केले होते. त्यांना हा उपक्रम एव्हढा आवडला कि त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांना एक विस्तृत पत्र लिहून उपक्रमाचे कौतुक केले होते. स्वतः मोडीलिपी प्रशिक्षण वर्गात शिकविण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या प्रशिक्षण वर्गास उद्घाटन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सन्मानीय मंत्री महोदय यांनाही आमंत्रित करून या उपक्रमाची उंची वाढविण्याचा व वृत्तपत्रातून, दूरदर्शनवरील बातम्यांतून व्यापक प्रसिद्ध मिळून दिली.
हे काम माझ्या ड्युटीचा भाग नव्हता पण आपण काहीतरी ऐतिहासिक दस्तावेज वाचण्यास सुकर होईल असे काम करावे या सद्भावनेतूनच सुरू केले त्याला उत्तम प्रतिसाद मिळत गेला याचे खूप खूप अतिव समाधान मिळत आहे.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451

Dr Bhaskar Dhatavkar
Dr Bhaskar Dhatavkar