
मेलबर्नवरून राजधानी कॅनबेराला भेट.हा पंचेचाळीस मिनिटाचा हवाई प्रवास करण्यासाठी सकाळी लवकरच उठावे लागले. पुन्हा बॅगाची तपासणी, औपचारिकता पूर्ण झाल्यावर आम्ही कॅनबेरा या ऑस्ट्रेलियाच्या नवनिर्मीत राजधानीत प्रवेश केला.

हे शहर खूपच नियोजन करून कल्पकतेने निर्माण केलेले आहे. येथे आता ऑस्ट्रेलियन सैनिकांनी दुसर्या महायुद्धात जी अतुलनीय अभिमानास्पद कामगिरी बजावली तिचे युध्द स्मारक तयार करण्यात येत आहे. ही वास्तुही अतिशय देखणी असून ती नावीन्यपूर्ण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सोल्जर्स यांचे स्टच्यू जागोजागी उभारण्यात आले आहेत. याठिकाणी आपल्याकडे प्रजासत्ताक दिनानिमित्त जशी परेड होते तशीच परेड होत असते. सर्वत्र निट नेटके स्वच्छ गुळगुळीत रस्ते, सदाबहारीत हिरवीगार वृक्षवेली, मध्येच विवीध फुलांच्या बागा, हरितभरी पसरलेली लाॅनरूपी हिरवीचादर, कुठेही प्रवास करताना जी आनंददायक मूड येतो तो शब्दातीत असतो. या शहराच्या निर्मात्यांस सॅल्युट करावयास हवेच.

शेवटी ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय राॅयल मिंटला दिलेली भेट. याची माहीती दिलेली असल्याने त्याची पुनराउक्ती करीत नाही. आम्ही एक रात्रीचा मुक्काम या राजधानीच्या शहरात केला. रात्रीचे सुंदर चविष्ट भोजन आम्ही भारतीय रेस्टॉरंट मध्येच केले आणि हाॅटेल मध्ये परतलो. उद्या आम्ही बायरोड सिडनी या महत्वपूर्ण सांस्कृतिक राजधानीत करणार आहोत. मी माझ्या संवयीप्रमाणे आजचे टिपण आणि डायरी अपडेट करूनच झोपी गेलो.











