पट्टी समोसा उरलेल्या पिठापासून शंकरपाळे

उरलेल्या पिठापासून शंकरपाळे
साहित्य:
• पट्टी सामोस्याच्या उरलेल्या पट्ट्या
• लाल तिखट
• मीठ
• चाट मसाला
• तळण्यासाठी तेल
कृती:
हि पट्टी सामोसेची कृती. पट्टी सामोसे बनवल्यावर उरलेल्या पट्ट्यांचे तिखटमिठाचे शंकरपाळे करता येतात. असे तिखटमिठाचे शंकरपाळे कधीही खायला बनवता येतात. तर उरलेल्या पट्ट्यांपासून शंकरपाळे बनवण्याची हि कृती.
• पटट्याचे शंकरपाळ्यासारखे चौकोनी तुकडे करावे. व मध्यम आचेवर तेलात तळून काढावे. तळून झाले कि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे.
• नंतर एका बोलमध्ये घेऊन त्याला तिखट, मिठ, चाट मसाला लावून घ्यावा. हे शंकरपाळे एकदम कुरकुरीत आणि चविष्ट लागतात.